
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा किस नवीन रेकॉर्ड करणार आहे. यामध्ये किस, लिप लॉप किसचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमा पीकेमध्ये किसचा जलवा पाहायला मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किसची गरमागरम दृश्ये दाखविणे एक सिनेमाचे अंग होऊन गेले आहे. इम्रान हाश्मी याने किसचा रेकॉर्ड केला होता. त्यात तो माहीर असल्याचे म्हटले जाते. तर याच महिन्यात रिलीज झालेला ‘शुद्ध देसी रोमांस’मध्ये किसवर भर देण्यात आला होता. नवोदीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने किसमध्ये बाजी मारली होती. त्यांने या सिनेमात २७ वेळा किस करून हंगामा माजविला. यात लिप-लॉक किस याचाही समावेश आहे.
