गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरातील 12 जणांचा मृत्यू

मुंबई – धुळे जिल्ह्यातील दत्तानेगाव शिवारात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांसह एका तरुणाचा लीमडी नदीच्या पत्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. कल्पेश बोरसे , हितेश बोरसे, हरीश बोरसे अशी या तिघांची नावे आहेत.

दत्ताने गावातील काही गणेश मंडळे तसेच घरगुती गणेश विसर्जनासाठी गावातील युवक गावालगत असलेलेया लीमडी नदीवर गेले होते. विसर्जन करण्यासाठी कल्पेश आणि हितेश हे नदीच्या डोहात उतरले. मात्र डोहाच्या पाण्याच्या खोलीचा नेमका अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. दरम्यान कल्पेश आणि हितेश यांना पाण्यात बुडताना पाहताना नागरिकांनी आरडओरड केली . या वेळी जवळच गुरे चारण्यासाठी आलेल्या तरुणाने या दोघांना पाण्यात झेप घेतली. मात्र या गुराख्याचाही बुडून दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान बर्‍याच वेळ शोध घेतल्यानंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात गावकर्‍यांना यश आले.

नाशिक जिल्ह्यात गणेशविसर्जनादरम्यान 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. चांदवडमधल्या 3 आणि निफाडमधल्या 3 जणांचा समावेश आहे. तसेच औरंगाबादमध्येही विहिरीत बुडून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment