दुबई – सौदी अब्जाधीश राजपुत्र अल वालिद बिन तलाल याने या वर्षअखेरी अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला येत असलेल्या टिवटर आयपीओ चे शेअर न विकण्याचा निर्णय घेतला आहे. तलाल हा जाणकार गुंतवणूकदार म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या मालकीच्या इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट फर्म असलेल्या किंगडम होल्डींग मधून ट्विटर मध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक २०११ मध्ये केली आहे.
तलाल यांच्या म्हणण्यानुसार ट्विटर मधील गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे. फर्मने त्यांचा आयपीओ बाजारात आणला तरी तो त्याच्या हिश्शाचा कोणताही भाग विकी्र करणार नाही कारण ही तर केवळ सुरवात आहे. तलाल याने या फर्मच्या माध्यमातून सिटी ग्रुप, रूपर्ट मरर्डाकच्या न्यूज कॉर्प मध्येही लक्षावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. ट्विटर च्या पब्लीक इश्यू नंतर कंपनी एकदा लिस्टेट झाली की तिची मालमत्ता किमान १० ते १५ अब्ज डॉलर्सवर जाईल असे सांगितले जात आहे. तलाल यांच्या मते मात्र ही मालमत्ता त्यापेक्षाही अधिक होणार आहे.