लखनभैया एन्काऊंटरमधील सरवणकरचा कारागृहात मृत्यू

नवी मुंबई – लखनभैया एन्काऊंटर केसमधील दोषी पोलीस अधिकारी अरविंद सरवणकर याचा तळोजा कारागृहात आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे छोटा राजन टोळीचा गुंड लखनभय्या याचा 2006 मध्ये पोलिस चकमकीत मृत्यू झाला.

मात्र ही चकमक बनावट असून चकमक होण्याअगोदरच पोलिसांनी लखनभय्या याला ताब्यात घेऊन त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप लखनभय्या याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानुसार या बनावट चकमक प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह 21 पोलिसांना दोषी ठरवले होते.

यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर यांचाही समावेश होता. दोषी ठरलेल्या पोलिसांची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती. तिथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी अरविंद सरवणकर याचा मृत्यू झाला आहे.