
मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा सुधारू लागली असून, हा नवनिर्वाचित गव्हर्नर राजन यांचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा सुधारू लागली असून, हा नवनिर्वाचित गव्हर्नर राजन यांचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या मे महिन्यापासूनच अमेरिकी डॉलरपुढे रुपयाने गुडघे टेकले होते. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 68 रूपयांवर पोहोचली होती. म्हणजे रूपयाच्या किंमतीत 27 टक्क्यांची घसरण झाली. डॉ. राजन यांनी आल्या आल्या रूपयाची स्थिती सावरण्यासाठी उपाय आखले. या उपचारांची मात्रा बरोबर लागू पडली. रूपया आता सावरला असून, सध्या त्याची किंमत प्रति डॉलर 63 रूपयांच्या घरात आली आहे.
शेअर बाजारातही सध्या चैतन्य आले आहे. मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 727 अंशांची उसळी घेतली होती. मोठ्या गुंतवणूकदारांनी पुन्हा भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवल्याने सोन्याच्या किंमतीतही 733 रूपयांची घसरण झाली. सीरियावर युद्धाचे ढग जमू लागताच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती भडकण्याची शक्यता होती. पण, युद्धाचे ढग निवळताच कच्च्या तेलाच्या किंमतीही उतरल्यात.
सीरियाचा प्रश्न राजकीय मुत्सद्देगिरीने सुटण्याची शक्यता निर्माण होताच भारतीय शेअर बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटू लागलेत. रूपयाची बळकटी, भारतीय निर्यातीत झालेली वाढ आणि सेन्सेक्समधली तेजी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी पालवी फुटलीय. तेजीचा हा माहोल कायम राहण्याची चिन्हे दिसत असून, डॉ. रघुराम राजन हे त्यादृष्टीने ‘विघ्नहर्ता‘च ठरले आहेत.