पुण्यातील जे प्रमुख सार्वजनिक गणपती मानले जातात त्यात बाबू गेनू मंडळाच्या व अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा समावेश असतो. तो गणपती नवसाचा गणपतीही मानला जातो. या दहा दिवसात येथे काही टन नारळ येतात. त्याची आरासही एखाद्या मोठ्या महालाप्रमाणे असते आणि रात्रंदिवस दर्शकांची रांग असते.
गणपती आले आणि गौरीही आल्या
गणपतीच्या या महोत्सवी येण्याला त्याची आई गौरी यांच्या येण्याने खर्या अर्थाने परिपूर्णता येते. घरातील गृहिणींना आज आपली आई आल्याचा आनंद होत असतो. आज घरोघरी गौरी आल्या आहेत.
