बिग बी यांना ‘ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार’

मुंबई: बॉलिवूडचा शहेंशहा अमिताभ बच्चन यांना आज (बुधवार) दिल्लीमध्ये ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर अमिताभ संसदेचा दौरासुध्दा करणार आहेत. बिग बी यांनी आपल्या व्टिटर अकाऊंटवर याबाबत लिहिले असून ते म्हणाले, की ‘उद्या (बुधवार) माझ्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी तसेच पुरस्कार येत आहेत. संसदेचे अध्यक्षांसोबत बैठक आणि संसद भवनातील अत्यंत खासगी आणि सुरक्षित भागात जाणे तसेच मला ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार मिळणे हे अत्यंत आनंद देणारे क्षण आहेत.’

बच्चन यांना 1984 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1999 मध्ये बीबीसीने घेतलेल्या एका ऑनलाईन मतदानात अमिताभ यांचे नाव ‘ग्रेटेस्ट स्टार ऑफ स्टेज फॉर द मिल्लेनिअम’ म्हणून निवडले गेले होते.

अमिताभ यांनी 180 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले असून त्यांना 2007 मध्ये फ्रान्स सरकारकडून फ्रान्सच्या सर्वोच्च नागरिकाचा ‘नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर लंडनच्या मॅडम तुसाद यांच्या वॅक्स संग्रहालयात 200 मध्ये बीग बींचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला होता. तर 2012 मध्ये लंडनच्या साऊथवार्कमध्ये ऑलिम्पिक रॅलीच्या शेवटच्या फेरीत अमिताभ यांना ऑलिम्पिकची मशाल घेऊन धावण्याचीही संधी मिळाली होती.

Leave a Comment