जिया खानच्या स्टायलिस्ट चेरियनचा संशयास्पद मृत्यू

मुंबई – तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या करणारी अभिनेत्री जिया खान हिचा फॅशन स्टायलिस्ट अनिल चेरियन याचा गोराई समुद्र किना-यावरील एका बंगल्यातील विहिरीत मृतदेह आढळला आहे. पोलिसांना गोराई येथील बंगल्यातून काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत.

चेरियन यांच्यासोबत पार्टीत सहभागी झालेल्या लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अनिल चेरियन याने अभिनेता शेखर सुमनसोबतही अनेक वर्षे काम केले होते. सध्या तो जियाच्या आयुष्यावर वेधलेल्या बोल्ड बॉलिवूड’ या चित्रपटासाठी स्टायलिस्टचे काम करत होता. त्याच्या मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.