कंगनाला इच्छा डायरेक्टर बनण्याची

नेहमी हटके भूमिकांद्वारे प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पडणारी कंगना राणावत लवकरच दिग्दर्शकाच्या दिसणार आहे. कंगनाला आत्मचरित्र दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे. सध्या बिझी शेड्युलमुळे तिला यासाठी वेळ मिळत नाही आहे. मात्र दिग्दर्शन करण्याचा विचार तिने पक्का केला असून, यासाठी ती एका चांगल्या आत्मचरित्राच्या शोधात आहे.

कोणत्याही चित्रपटात काहीतरी वेगळ हटके करण्याचा कंगनाचा प्रयत्न असतो. प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आगामी बहुचर्चित ‘क्रिश-3’ चित्रपटात कंगना सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थातच तिचा हा रोल नेगेटीव्ह आहे. या चित्रपटात कंगनासह ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि विवेक ओबरॉयही दिसणार आहेत. या चित्रपटानंतर कंगनाकडे ”उंगली”, “क्वीन”, “रिव्हॉलव्हर राणी” आणि “रज्जो” हे चित्रपट आहेत. यामुळे कंगना सध्या जास्तच बिझी आहे. मात्र दिग्दर्शन करण्याची आपली मनपासून इच्छा असल्याचे कंगना सांगते.

कंगनाने यापूर्वी एका ऑस्ट्रेलियन लेखकाने लिहिलेल्या लघुपटाचे दिगदर्शन केले आहे. हा लघुपट अमेरिकेत चित्रित झाला आहे. आता कंगनाला एक आत्मचरित्रावर आधारित सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे. चांगली कथा सापडली की, कंगना लगेच यावर काम सुरु करणार आहे.