चित्रपट निर्माते बोनीकपूर यांना खंडणीसाठी धमक्या

मुंबई – बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेत्री श्रीदेवी हिचे पती बोनीकपूर यांना गेले कांही दिवस अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी धमक्या येत आहेत. खंडणी न दिल्यास गोळ्या घातल्या जातील अशा धमक्या त्यांना येत त्यांनी या संदर्भात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरून खंडणीसाठी वारंवार फोन येत असल्याचे बोनीकपूर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून खंडणी विरोधी पथकानेही या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार या धमक्या डॉन रवी पुजारी याच्याकडून येत असाव्यात. बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढविली गेली असल्याचेही समजते.

बॉलिवूडला अंडरवर्ल्डकडून धमक्या येणे हा गेली कांही वर्षे नित्याचा प्रकार घडला आहे.१९९० पासून याची सुरवात झाली असून आजपर्यंत अनेक प्रसिद्ध नट, नट्या, निर्माते, दिग्दर्शक यांना अशा धमक्या मिळाल्या आहेत. मुख्यतः पैसे उकळण्यासाठी या धमक्या दिल्या जातात असे पोलिसांचे म्हणणे आहे.