यूट्यूबची सवय भारतीयांना जडावी यासाठी गुगलचे प्रयत्न

मुंबई – सर्च इंजिन गुगल यांच्या व्हीडीओ सव्र्हिस यू ट्यूबची दररोजची सवय भारतीयांना जडावी यासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न जारी असून हा व्यवसाय वाढीचाच एक भाग असल्याचे आशिया पॅसिफिक विभागाचे संचालक गौतम आनंद यांनी सांगितले.

दर महिन्याला तब्बल ५ कोटी ५० लाख युजर गुगलच्या यूट्यूबचा आनंद घेतात. यापैकी ४० टक्के युजर मोबाईलवर ही सेवा पाहतात असे सांगून आनंद म्हणाले की आजकाल लोकांच्या आवडीत वेगाने बदल होत आहेत. त्याची दखल घेतली असून या पुढे विविध प्रकारची करमणूक युजरला पाहता यावी यासाठी चित्रपट, टिव्ही शो च्या ब्रॉडकास्टरशी संपर्क साधला गेला आहे. युजरनी मोबाईलवरच या सेवेचा आनंद घ्यावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

यूएस आणि ब्रिटन पाठोपाठ आता भारतातही यू ट्यूबवर कॉमेडी विक सुरू होत असून येत्या १२ सप्टेंबरपर्यंत ४०० तासांचे कॉमेडी शो लोड केले जात आहेत. बॉलिवूड, ग्रेट इंडियन लाफ्टर, एमटीव्ही बकरा, कहानी कॉमेडी सर्कस की असे विविध कार्यक्रम दाखविले जाणार असनू तेलगू, तमीळ, मराठी, पंजाबी, मल्याळी, गुजराथी,कन्नड या भाषांतही ही सुविधा दिली जात आहे.

Leave a Comment