सोलापूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

सोलापूर – सोलापूर जिल्ह़‍यातील बार्शी येथे एका महिलेवर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी रात्री उशीरा पिडीत महिलेने वैराग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा नराधमांना अटक केली असून तिस-या आरोपीचा शोध सुरु आहे.

बार्शी तालुक्यातील तडवळे येथील एका आश्रम शाळेत काम करणारी महिला मंगळवारी संध्याकाळी कामावरुन घरी परतत होती. या दरम्यान तिघा नराधमांनी तिला रस्तणयात अडवले. त्यांनतर निर्जनस्थळी नेउन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी रात्री उशीरा पिडीत महिलेने वैराग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानतर लगेचच पोलिसांनी तपासाची चक्रे पिफरवली व अवघ्या काही तासांत सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरेापीना अटक केली आहे. घटनेनंतर तिसरा आरोपी गावातून पसार झाला असून पोलिस त्यायचा शोध घेत आहेत.