नवी दिल्लीच- ‘बीसीसीआय’च्या निमंत्रणावरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ भारताच्या दौ-यावर येण्याची शक्यता आहे, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मायदेशात वाजतगाजत निरोप देण्यासाठी ‘बीसीसीआय’ची ही फिल्डिंग असल्याचे बोलले जात आहे, तरी आपण अद्याप निवृत्तीस तयार नसल्याने सांगत या विक्रमादित्या सचिनने सर्वांची बोलती बंद केली आहे.
वेस्ट इंडीजने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या दौ-यावर येन्यास अनुकूलता दाखविली आहे. दोन कसोटी सामने व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असा विंडीजचा हा छोटेखानी दौरा असणार आहे. ‘दौ-यातील सामन्यांच्या तारखा व मैदाने यांची निश्चित पुढील काही दिवसांत होईल. ‘आयसीसी’च्या वेळापत्रकानुसार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा २१ नोव्हेंबर ते १९ जानेवारी असा आहे.
वेस्ट इंडीजचा संघ २ नोव्हेंबरपासून भारताच्यास दौर्याशवर आला तर भारताचा संघ ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेत दाखल होऊ शकणार नाही. शिवाय १९ जानेवारीपासून भारताचा न्यूझीलंड दौरा सुरू होणार आहे. त्यामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार की लांबणीवर पडणार याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.