पुणे : यूरोपातील वाहन उद्योगाशी संबंधित घडामोडींना वाहिलेले इव्हो हे मासिक भारतात आणण्यात येणार असून त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील पिनाकल समूहाने ब्रिटनमधील डेनिस पब्लिशिंगशी सहकार्य करार केल आहे अशी घोषणा गोल्डन स्पारो कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रोहन पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
भारतात वाहन उद्योगाला वाहिलेले मासिक सुरू करणार
भारतात वाहन उद्योगात होत असलेल्या घडामोडींची दखल हे मासिक घेणार असून लवकरच डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध केले जाणार आहे असे नमूद करून पवार म्हणाले की, इव्हो ला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या क्षेत्रातील इतर परकी प्रकाशने भारतात आणण्याचा आमचा विचार असून त्यासाठी गोल्डन स्पारो मिडिया वर्क्स ही नवी कंपनी स्थापन केली आहे.
इव्हो चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार असून त्याची किंमत १०० रुपये असेल. वाहन उद्योगातील प्रकाशन क्षेत्राचा १३ वर्षाचा अनुभव असलेले शिरीष चंद्रन हे या मासिकाचे संपादक म्हणून काम पाहणार आहेत.
