आसाराम बापूंचे पौरुषत्व झाले सिद्ध

जोधपूर- अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले वादग्रस्त आध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांची पुरूषार्थ चाचणी करण्यात आली असता बापू पास झाले. यापूर्वी बापूंनी बलात्कार करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या असमर्थ असल्याचे सांगितले होते. मात्र या चाचणीने बापूंचा दावा सपशेल खोटा ठरला आहे.

आसाराम बापूंच्या जोधपूर येथील आश्रमातील अल्पवयीन मुलीने बापूंवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी बापूंना शनिवारी रात्री अटक झाली आहे. रविवारी त्यांना जोधपूर येथे आणल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी बापूंना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले होते. रुग्णालयात त्यांची पुरुषार्थ चाचणी करण्यात आली. या चाचणीत बापू पास झाले. मात्र बापूंनी आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

गुन्हा सिध्द झाल्यास 10 वर्षांची शिक्षा

आसाराम बापूला शनिवारी मध्यरात्री इंदोर येथील आश्रमातून अटक झाल्यानंतर त्यांना दिल्ली मार्गे जोधपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर बापूची चौकशी करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान बापूच्या पौरुषत्वाचीही चाचणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आसाराम बापूवर झालेला आरोप सिद्ध झाल्यास त्यांना किमान 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. जोधपूर पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आसाराम बापूंना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. रात्रभर बापूला इंदोर येथील विमानतळावर ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी जोधपूरला नेण्यात आले. प्राथमिक चौकशीत पीडित मुलीने केलेल्या आरोपात तथ्य आढळून आले आहे.

शनिवारी रात्री त्यांना अटक केल्यानंतर रात्री एकच्या सुमारास त्यांना जोधपूर येथे आणण्यात आले. रविवारी त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ते फिट असल्याचे सांगण्यात आले. तरीही त्यांची तपासणी करण्यासाठी 4 डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. मात्र, राजधानी दिल्लीत त्यान्च्या समर्थकांकडून काही गोंधळ होऊ नये, म्हणून अगोदरच बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

अटक होण्यापूर्वी आसाराम बापूने आपल्याला कोणीही अटक करु शकत नाही, असे म्हटले होते. एवढेच नव्हे तर जर अटक झाली, तर त्यांचे समर्थक जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. दुसरीकडे आसाराम बापूला अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित मुलीच्या वडिलांनी शाहजहानपूर येथे उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबाही मिळू लागला होता. त्यातच शनिवारी रात्री आसाराम बापूंना अटक झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.