डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी नाऊमेद होऊ नका – पोलिस आयुक्त

पुणे, – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाची व्य्नती खूप मोठी असून तपासाला वेळ लागत आहे. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी पोलिसांना नाऊमेद होऊन चालणार नाही. अनुषंगिक सर्व घटक लक्षात घेऊन सर्व पातळ्यांवर तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलीस आयु्नत गुलाबराव पोळ यांनी आज (दि. 31) पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज अकरा दिवस पूर्ण होत असून अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे मिळालेले नाहीत. परिणामी सामजिक संघटनांपासून राजकारण्यांपर्यंत सगळीकडून पोलिसांवर आरोप होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे मनोबल ढळू न देता त्यांना तपास करण्यास सांगण्याची गरज आहे. पोलिसांवर टीका होणे साहजिकच आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडून चांगल्याच कामाची अपेक्षा असते त्यामुळेच ते टीका करतात. त्यांकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रीत करायचे असते; आणि आम्ही ते करत आहोत, असे पोळ यांनी सांगितले.

पुण्याबरोबरच मुंबई आणि सातारा येथे डॉ. दाभोलकर यांचा सतत वावर होता. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या कामाचा व्याप असला तरी या तीन शहरांत त्यांचे सर्वाधिक वास्तव्य होते. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवून दिवस निवडून हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांची पथके या तीनही शहरातील दाभोलकर यांच्या कार्याचा आढावा घेत आहेत. त्यातून कोणता कोणता ्नल्यू न्नकीच मिळेल. घटना घडलेले ठिकाण आणि आसपासच्या परिसरात त्या दिवशी आणि आधीच्या काही दिवसांतील मोबाइलचे कॉल डिटेल्स काढण्यात आले असून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. तीन करोडहून अधिक कॉल्स पोलिसांनी गोळा केले आहेत. त्यांचा अभ्यास सुरू आहे, असेही पोळ यांनी सांगितले.