
पुणे, – देशाच्या आयात-निर्यातवरून रुपयाचे अवमूल्यन होत असले तरी देशातून बुद्धिमत्ता सर्वाधिक निर्यात होत आहे. त्यामुळे राज्याचा विकास तथा स्वरूप बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

पुणे, – देशाच्या आयात-निर्यातवरून रुपयाचे अवमूल्यन होत असले तरी देशातून बुद्धिमत्ता सर्वाधिक निर्यात होत आहे. त्यामुळे राज्याचा विकास तथा स्वरूप बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
डे्नकन एज्युकेशन सोसायटीच्या जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा पदवीप्रदान समारंभ मर्ग्युसन महाविद्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह श्रीकृष्ण कानेटकर आणि प्रशांत गोखले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आले. राज ठाकरे यांनी ‘डिझाईनम या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.
राजकारणात अपघातानेच आलो आहे. मुळात मला अॅनिमेटर व्हायचे होत, अशी खंत व्य्नत करीत राज ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी उत्तम डिझाईनसाठी जागरूक असले पाहिजे. विचार चांगला असेल, तर उत्तम डिझाईन होऊ शकते. तशी मनातून डिझाईन निर्माण झाली पाहिजे. शालेय शिक्षणात चित्रकला हा ऑप्शन विषय असेल, तर योग्य डिझाईन येणार कोठून? उत्तम डिझाईनर होण्यासाठी स्टीव्ह जॉबचा आदर्श घ्या, असा सल्लाही त्यांना दिला.
जगातील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ आहे. बिहारमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, माफ करा होत्या, असे म्हणत राज ठाकरे यांनी यासीन भटकळ बिहारमध्येच कसा सापडतो, असा सवालही उपस्थित केला. समाजात वावरत असताना झाडं, चांगले फु टपाथ, उद्यान, स्वच्छता असणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांकडे ‘सेन्सम असावा लागतो. तशी इच्छाश्नती नाही. राज्याचे डिझाईन बदलयाचे असेल किंवा विकास करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विकास काकतकर म्हणाले, फ र्ग्युसन महाविद्यालय आता खासगी विद्यापीठासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत आणखी चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहू, असेही त्यांनी सांगितले. प्रशांत गोखले यांनी आभार मानले.