पुणे, – गेल्या तीन वर्षांपासून पात्र उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून नियु्नती करण्यात आली नाही. या निर्णयास शासनाकडून दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ सुमारे 100 उमेदवारांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयासमोर सामुहिक मुंडण केले. या उमेदवारांना तत्काळ नियु्नतीचे आदेश द्या; अन्यथा प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज बंद पाडू, असा इशारा युवक क्रांती दलाने दिला आहे.
शिक्षक नियुक्तीसाठी सामुहिक मुंडण – युक्रांदचा इशारा
राज्यात तीन वर्षांपूर्वी डी.एड. सीईटी झालेल्या पुनर्पडताळणीमधून तब्बल 3 हजार 149 पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियु्नतीचे आदेश मिळावे, या मागणीसाठी सुमारे 500 विद्यार्थी व युक्रांदच्या वतीने गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप या मागण्यांवर शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अखेर उमेदवारांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी च्नक सामूहिक मुंडण केले.
यासंदर्भात, शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा उद्याच (दि. 31) प्राथमिक शिक्षण विभागात सर्व उमेदवार प्रवेश करणार आहोत आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज बंद पाडणार आहोत, असे युक्रांदचे राज्य संघटक विकास लवांडे आणि कार्यवाह संदीप बर्वे यांनी सांगितले.
