वाराणसी – वाराणसीच्या बाबतपूर विमानसळावर कस्टम अधिकार्यांनी शारजाहवरुन येणार्या विमानातील पाच जणांना सोन्याची तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, महसूल अन्वेषण विभाग (डीआरआय) आणि कस्टम टीमच्या या संयुक्त कारवाईमध्ये भारतात बेकायदेशीररित्या आणले जाणारे पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात कस्टम विभागाकडून अजून कसलीच माहिती देण्यात आली नाही. परंतु या पाचही जणांची तपासणी करणार्या डॉक्टरच्या सांगण्यानुसार या आरोपींनी आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये ही सोन्याची बिस्कीटे लपवली होती.
