कोल्हापूर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विजय कोंडके यांची निवड झाली आहे.
अ.भा.म.चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोंडके
अध्यक्षपदाच्या निवडणूकीत विजय कोंडके यांच्याविरुद्ध अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर उभे होते. प्रभारी अध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या निवडणूकीत चिठ्ठ्या टाकून मतदान करण्यात आले. या मतदानात कोंडके आणि पाटकर यांना समसमान सात मते मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत पहिल्या अडीच वर्षांसाठी विजय कोंडके अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. तर त्यापुढील अडीच वर्षांसाठी विजय पाटकर चित्रपट महामंडळाचे काम पाहणार आहेत.
दरम्यान, वादग्रस्त मावळते अध्यक्ष प्रसाद सूर्वे यांच्या कारभाराबाबत झालेल्या टीकेनंतर दोन ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत सूर्वे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचे मत अध्यक्ष विजय कोंडके यांनी व्यक्त केले.
