बापूंभोवती फास आवळला, देश सोडून जाण्यास मनाई

नवी दिल्ली – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूंविरोधात समन्स बजावण्यात आले. पण, बापू चौकशीसाठी पोलिसांसमोर यायला टाळटाळ करत आहेत. त्यामुळे जोधपूर पोलिसांनी आता बापूविरोधात लूकआऊट नोटीस बजावलीय. या लूकआऊट नोटीसमुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयानं राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्ली सरकारला या प्रकरणाच्या तपासाची वेळोवेळी माहिती द्यावी, असे सख्त आदेश दिले आहेत. दरम्यान, बापूविरोधात बजावलेल्या समन्सचा विरोध करण्यासाठी मध्य प्रदेशच्या उद्योग मंत्र्यांनी बापूच्या इंदूरमधल्या आश्रमाबाहेर आंदोलन केलं.

आसाराम बापूंनी जोधपूर येथील आश्रमात आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार एका तरूणींने केलीय. या तक्रारीमुळे बापूंविरोधात लैगिंक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.