
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी तील कॉलेज सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मुख्य सचिवांकडे कॉलेज सुरू करण्यासंदर्भात फाईल गेली आहे. काल जरा मिस कम्युनिकेशन झाले होते. काल काही अटोनॉमी असलेल्या कॉलेजने आपली कॉलेजेस सुरू केली आहे. आम्ही आज कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे. माझ्याशी अजित पवार साहेबांचे बोलणे झाले आहे. 11 आणि 12 वीचे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे राज्यातील कॉलेज सुरु करण्याबाबत मोठे वक्तव्य
सामंत दुष्काळ मदतीबाबत बोलताना म्हणाले की, पंचनाम्याचे अहवाल आल्यावर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे. सामंत देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, नाट्यगृहांमध्ये रोज कार्यक्रम होतात. पण आम्ही सगळे नियम पळून दसरा मेळावा साजरा करत आहोत. विरोधकांनी आपल्या कार्यक्रमात किती नियम पाळले आहेत. विरोधकांचे काम टीका करणे असल्याचेही ते म्हणाले.
