
मुंबई – डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चालू असलेली घसरण चालूच असून आज (सोमवार) आठवड्याच्या पहिल्या दिवशीही डॉलरच्या तुलनेत रुपया 40 पैशांनी घसरुन 64.20 वर पोहचला आहे. मागील आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी रुपया 63.20 वर बंद झाला होता. त्यानंतर आज सकाळी आठवड्याच्या सुरवातीलाच रुपयामध्ये 70 पैशांनी घसरण होऊन रुपया 63.90 वर पोहचला होता. जाणकारांच्या मते रुपयांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता आहे. तर आयतदारांकडून डॉलरची मागणी वाढत असल्याने रुपयामध्ये ही घसरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
