नवी दिल्ली – आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ते आता अडचणीत सापडले असून याप्रकरणी जोधपूर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. चौकशीसाठी ते ३० ऑगस्टपर्यंत हजर झाले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येऊ शकते असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी जोधपूर पोलिसांनी समन्स जारी केले आहे.
चार दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूंनी लैंगिक शौषण केल्याची तक्रार दाखल केली होती. जोधपूर येथे बापूंच्या गुरूकुलात शिकत असताना बापूंनी अत्याचार केल्याची तक्रार पिडीत मुलीने केली होती. यानंतर आसाराम बापूंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी जोधपूर पोलिसांनी समन्स जारी करुन चार दिवसांच्या आत पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश आसाराम बापू यांना दिले आहेत.
आसाराम बापू ३० ऑगस्टपर्यंत ते हजर झाले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येऊ शकते असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आसाराम बापूंनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. चुकीचे आरोप करून आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.