मुंबईतील गँगरेप प्रकरणचा बॉलिवूडकडून निषेध

मुंबई: मुंबईतील महिला फोटोग्राफरवरील बलात्काराचा सर्वस्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. बलात्कारित तरुणीच्या मागे अवघा देश उभा ठाकला आहे. मुंबईतील गँगरेपप्रकरणी बॉलिवूडनेही रोष व्यक्त केला. मुंबईतील कार्टर रोड भागात बॉलिवूडमधील कलाकारांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये बॉलिवूडमधील शेकडो कलाकार एकत्र आले होते.

यावेळी बॉलिवूडमधील काहीं कलाकारानी या घटनेबद्दल सरकारला जबाबदार धरले. तर काहींनी समाजातल्या विकृतीला.बलात्कारित तरुणीच्या मागे अवघा देश उभा असल्याचे मतही अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आगामी काळात जर अशा घटनांना पायबंद घालयाचा असेल तर पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याची सूचना यावेळी बॉलिवूडमधील काहीं कलाकारनी व्यक्त केली.या मोर्चामध्ये बॉलिवूडमधील शेकडो कलाकार सह्भागी झाले होते.

Leave a Comment