
त्रिपोली- लेबनॉनच्या उत्तर भागातील त्रिपोली शहरात आज (शुक्रवारी) दोन मोठे बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये किमान 27 लोक मृत्युमुखी पडले असल्याचे येथील स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. अनेकजण जखमी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी व सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट एका मशिदीच्या बाहेर घडवून आणण्यात आला. येथील नमाज संपल्यानंतर तिथेच हा बॉम्बस्फोट झाला. तसेच, दुसरा स्फोट त्रिपोली शहराच्या मध्यभागात झाला.
