पुणे, : पुण्यातील ऑफिस स्पेसचा वापर मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत ५ ८ ट क्के वाढल्याची दिलासा देणारी आकडेवारी नाइट फ्रान्क या आंतरराष्ट्रीय सल्लासेवा संस्थेने केलेल्या पाहणीत आढळली असून हडपसर, हिंजवडी आणि खराडी या परिसरातील ऑफिस ला प्राधान्य दिले जाते आहे. सध्याच्या मंदीचा आणि रुपयातील घसरणी चा सर्वात मोठा फटका बांधकाम क्षेत्राला सहन करावा लागत असून स्थिती सुधारण्यास आणखी दीड – दोन वर्षे लाग तील असा अंदाज नाइट फ्रान्कचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुण्यातील ऑफिस स्पेसचा वापर – ५ ८ ट क्के वाढ
गेल्या दहा वर्षातील नीचांकी देशांतर्गत उत्पादन , घसरता रुपया , वाढती वित्तीय आणि चालू खात्या तील तुट , महागाईचा वाढता आलेख , शेअर बाजारातून पिसा काढून घेणारे परकी संस्थात्मक गुंतवणूकदार अशी निराशा वाढीची कारणे नमूद करून बैजल म्हणाले की असे असले तरी माहिती तंत्रज्ञान आणि त्याधारित उद्योग , बँक आणि वित्तसेवा क्षेत्र यामुळे पुण्यासह देशातील सात मोठ्या शहरात ऑफिस स्पेसची मागणी टिकून राहिली आहे. भाडे क्रराराने जागा देताना त्याचे दर वाढले आहेत.
केवळ रिअल इस्टेटचा विचार केल्यास त्याला सहाय्यभूत ठरणारी अनेक विधेयके चालू संसद अधिवेशनात मान्य झाल्यास मागणी सुधारेल मात्र आगामी काल निवडणुकीचा असल्याने बेभरवशाची स्थिती राहणार आहे असे नमूद करून ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षाच्या अखेर ४ ० लाख चौरस फुट ऑफिस स्पेस जागा एकट्या पुण्यात उपलब्ध होणार आहे. त्या तुलनेत मागणी मात्र २ ० टक्क्यांच्या घरात राहील असा अंदाज आहे.
