भारतीय अभियंत्यांनी गुणवत्ता आणखी चांगली करण्यावर भर द्यावा – एम आय टी तज्ञ

पुणे, : भारतातील लोक, त्यांची आश्चर्य वाटावी अशी संस्कृती आणि संगणक क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची धडपड कौतुकास्पद आहे, मात्र भविष्यात भारतीय अभियंत्यांनी कौशल्याचे नेमके मूल्य घेण्यावर तसेच गुणवत्ता आणखी चांगली करण्यावर भर द्यायला हवा अशी अपेक्षा संगणक विज्ञानात मसेच्युसेटस इन्स्टीट्यूट मधून पहिली पी ए च डी संपादन करणारे अलन शेर आणि सल्लासेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डग्लस हॉफमन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले .

अलन शेर प्रथमच पुण्यात आले असून ते देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्यात कार्यरत असलेल्या जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला भविष्यातील जोखमी ओळ्खून कसे धोरण आखावे याचे मार्गदर्शन करणार आहेत. नरेंद्र बारहाते या मराठी उद्योजकाने शून्यातून उभ्या केलेल्या सीड इन्फोटेक समूहाच्या विसाव्या वर्धापनदिननिमित्त आयोजित कार्यशाळेसाठी हे दोघे येथे आले आहेत. सुमारे २ ५ ते ३ ० मोठे उद्योग त्यांचे मार्गदर्शन घेणार आहेत. अलन शेर हे जगातील आघाडीच्या आय बी एम कंपनीचे मानद फेलो आहेत.

गेली तीस वर्षाहून अधिक काल जगातील नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांना उत्पादन आणि सेवांचा विकास, चाचणी आणि अंमलबजावणी यामध्ये या दोघांचे योगदान मोठे आहे. यासंदर्भात जागतिक स्थिती आणि भारत याबाबत विचारता ते पुढे म्हणाले की एखादी सेवा किंवा उत्पादन विकसित करताना ते दीर्घकाळ चालेल हा विचार महत्वाचा ठरतो. जपानमधील एक बँक सॉफ्टवेअरची चाचणी अपेक्षेनुसार न केल्याने बुडाली हे उदाहरण लक्षात घायला हवे. आज आय फोन किंवा सेल फोन बनवत असलेल्या कंपन्यातील स्पर्धा पाहता जगावर प्रभुत्व करणारी फिनलंडची नोकिया पहिल्या तीन पाच स्थानात नाही हे त्याचेच द्योतक आहे. ग्राहकाच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान विकसक यांच्यातील वाढती दरी त्यास कारण ठरते आहे. उत्पादनाची ,रचना, चाचणी आणि विक्रीतील समन्वय याचा आवाका उद्यॉअगतिल वरिष्ठांना नसल्याने असे प्रश्न निर्माण होतात, जगाच्या तुलनेत भारतात असे अनुभव कमी येतात कारण येथे असलेले अत्यंत कुशल मनुष्यबळ आणि समूहाला बरोबर घेऊन काम करण्याची येथील लोकांची क्षमता हे आहे.

चीनच्या तुलनेत येथील तरुण संगणक विज्ञानात चटकन प्रगती करतो. येथील छोट्या कंपन्याही विस्मयकारक कामगिरी करतात मात्र हा पुढावा टिकवून ठेवण्यास सध्याची गुणवत्ता वाढवायला हवी आणि कौशल्याचे नेमके मुल्य आकारायला हवे. डॉलरच्या तुलनेत रुपया अशक्त झाला तरी ही स्थिती कायम राहणार नाही. भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांना व्यवस्थापन आणि नेतेपदी असलेल्या व्यक्तीची जोखीम घेण्याची तयारी यात समतोल साधावा लागणार आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment