सलमान – कतरीना पून्हा दिसणार आयटम साँग मध्ये

दबंग खान सलमान आणि बॉलीवुडची बार्बी डॉल यांनी पून्हा एकत्र यावे अशी त्यांच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असून ते दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. अतुल अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटात सलमान – कतरीना एक आयटम साँग करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यापूर्वी “बॉडीगार्ड” चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफने एकत्र आयटम साँग केले होते. या आयटम साँगने चाहत्यांची मने जिंकली. आता त्यांची ही डांसची धूम अतुल अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. हे आयटम साँग कसे असणार आहे किंवा याचे बोल काय असणार आहेत, याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.

या चित्रपटाचे नाव काय आहे हे अद्याप कळू शकले नसले तरी हा एक कॉमेडी सिनेमा आहे. पुलकित सम्राट आणि सारा-जेन दियास यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.