वंदे मातरम नव्या रूपात

बकिंमचंद्र चटर्जी लिखित ’वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नव्या स्वरुपात भारतीय देश बांधवांच्या भेटीला आले आहे. या राष्ट्रभक्ती जागविणार्‍या गीताचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.

या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे यांनी तर संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर दिला आहे. सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींदे यांनी साथसंगत केली आहे. व्हिडिओ गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे.

वंदे मातरम हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे, असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे असे देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी विनामूल्य बहाल करीत आहोत असे ’युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’च्या मंदार गुप्ते यांनी सांगितले.