कॉग्रेस राष्ट्रवादीचा 26।22 असा फॉर्म्यूला ठरलेला नाही -ˆ माणिकराव ठाकरे

पुणे,-ˆ लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा 22।26 असा फॉर्म्युला ठरलेला नाही कारण अजून त्याबाबत बोलणीच सुरु झालेली नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी याची 22।26 अशी जागावाटपांची स्थिती ठरली असून या महिन्याअखेरीपर्यंत आम्ही उमेद्वारही जाहीर करणार, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी एका मेळाव्यात जाहीर केले होते त्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते पुढे म्हणाले, याबाबत आमचे धोरण केंद्रात ठरते.तसे अजून काही ठरलेले नाही त्याच प्रमाणे गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलणी ठरली होती पण त्यांना काही काम निघाल्याने ती झाली नाहीत त्यामुळे अजून बोलणी सुरुच झाली नसल्याने अजून 22।26 हा फार्म्युला निश्चित होण्याचा प्रश्नच नाही.

केंद्रसरकारने अन्नसुरक्षा धोरण राबविण्याचे ठरविले आहे, त्यात गरीबीरेषेखालील प्रत्येकाला तीन रुपये किलो दराने गहू, दोन रुपये दराने तांदूळ आणि एक रुपये दराने भरड धान्य देण्यात येणार आहे, याचा जनतेतील साठ टकके लोकांना फायदा होणार आहे, याबाबत लोकजागृती करण्यासाठी आपण राज्याचा दौरा करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेच्या वतीने सोनिया गांधीचे आभार माननारी बावीस लाख पत्रे श्रीमती गांधी यांना पाठविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.