गडचिरोली, चंद्रपूरचा तेलंगणामध्ये समाविष्ट करावा

गडचिरोली – सध्य स्थितीत वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती गरजेची आहे. आगामी काळात जर वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी आमदार धर्मरावबाबा अत्राम यांनी मंगळवारी केली. गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, वेगळा विदर्भ होणे हे गरजेचे आहे. वेगळे विदर्भ राज्य हे छत्तीसगढ किंवा उत्तराखंडपेक्षा सक्षम होईल. मात्र, वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा ते सात तालुक्यांमध्ये तेलगू भाषा बोलली जाते. चंद्रपूर जिल्ह्यामध्येही अनेक लोक तेलगू बोलतात. त्यामुळे भाषेचा काही प्रश्न निर्माण होणार नाही.

मुंबईतून आमचा विकास होईल, अशी आशा आता संपली आसल्याचे यावेळी बोलताना आत्राम यांनी स्पआष्टह केले. गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी करणारे पत्र त्यां नी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवले आहे, असेही त्यांनी सांगितले.