ताजचे लवासात १०० खोल्या’चे हॉटेल व आदरातिथ्य महाविद्यालयही

पुणे, : आदरातिथ्या सेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची केवळ भारतातच नव्हे तर आशिया आणि पश्चिमेकडील देशात कमतरता असून रोजगाराची प्रचंड संधी आहे असे ताज हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक रेमंड बिक्सन यांनी येथे पत्रकारांना सांगितले. पुणे जिल्ह्यातील लावासा येथे ताज समूह १ ० ० कोटी रुपये गुंतवून ८ ० ते १ ० ० खोल्यांची क्षमता असलेले नवे हॉटेल उभारणार आहे अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात देशात एक डॉलर गुंतवला तर त्यातून आठ डॉलर इतका उद्यम व्यवसाय मिळतो असे नमूद करून ते म्हणाले की गेल्या वर्षात केवळ पंचतारांकित हॉटेलात १ २ हजार नव्या खोल्यांची भर पडली आहे. मात्र त्या तुलनेत कुशल मनुष्यबळ निर्माण झालेले नाही . तसेच केंद्र आणि राज्याच्या पर्यटन खात्यात आणि अनुषंगिकलक्षात घेऊन क्षेत्रात म्हणजे बीपीओ , विमानसेवा , बँकिंग यांनाही अशा प्रकारचे मनुष्यबळ लागते अहे. देशातच आणखी ३ ० नवी तारांकित हॉटेल उभी राहणार असल्याने किती गरज निर्माण होईल हे लक्षात येते.

ताज समूह नव्याने उभारत असलेले हॉटेल येत्या दोन ते पाच वर्षात हस्ते पूर्ण होणार आहे अशी माहिती देऊन बिक्सन म्हणाले की भारतात प्रशिक्षण घेण्यास परदेशातील लोक येऊ शकतात ज्यामुळे आपल्याला परकी चलन मिलेल. स्वित्झर्लंडमधील इकोल हॉटेल द लुसानच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था ७ ० कोटी रुपये खर्चून लावासा येथे उभारण्यात आली आहे त्याचे उद्घाटन बिक्सन यांच्या हस्ते शुक्रवारी झाले .तसेच दीक्षांत समारंभ झाला.

पहिल्या तुकडीतील २ १ जणांना ओबेरॉय, मारीयट, राडीसन येथे नोकरी मिळाली आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून त्यासाठी २ ० लाख रुपये शुल्क आहे . ४ ५ ० विद्यार्थी घेण्याची या संस्थेची क्षमता असून प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीतून निवड केली जाते. एक वर्ष भारतात आणि दोन वर्षे परदेशात कार्यानुभव दिला जातो.

सुरक्षाविषयक प्रशिक्षण
भारतात आणि जगभरात होणारे वाढते दहशतवादी हल्ले लक्षात घेऊन इकोल संस्थेतून बाहेर पडणाऱ्या मुलांना सुरक्षाविषयक प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती यावेळी मुख्स्याधिकारी रोनी कुरियन यांनी दिली. त्यासाठी लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकारी लोकांची मदत घेतली जाते.