इशरत जहॉ ही व्यवस्थेची बळीˆ शरदराव पवार

पुणे, – इशरत जहाँ हिचा अहमदाबादमधील एन्कौंटरमधील बळी हा व्यवस्थेचा बळी होता, अशी टिपणी केंद्रीय अन्नमंत्री शरदराव पवार यांनी पुण्यात एका मेळाव्यात बोलताना केली. एका अल्पसं‘या कार्यकर्त्यांने ेविचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ती एका मुलाच्या प्रेंमात पडून अहमदाबादला गेली. तिथे तिला व तिच्या मित्राला संशयावरून पोलीसांनी बोलावून घेतले आणि दुसर्‍या दिवशी सोडून दिल्यावर काही तासात तिचा व तिच्या मित्रांचा गोळीबारात बळी गेला. तिला गोळी मारणारे आज तुरुंगात आहेत, मग त्या मुलीचा बळी हा व्यवस्थेचाच बळी मानावे लागेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.

मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ओबीसी, दलित आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी घटनेमध्ये जी तरतूद आहे. त्या वर्गाच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. यामध्ये ब‘ाह्मण, मराठा किंवा मुस्लीम समाजही असला तरीही हरकत नाही’ हिंजवडी येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग़‘ेसच्या त्रैमासिक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमु‘यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभपती दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये भारत फोर्ज कंपनी एक औद्योगिक वसाहती स्थापन करणार आहे. त्यामुळे नागरिकीकरण होणार आहे. या औद्योगिक कंपन्यांमध्ये उत्तर भारतीय लोकांची सं‘या वाढते आहे. ज्या नागरिकांच्या जमिनी गेल्यात, ज्यांचा व्यवसाय बुडाला त्या कुटुंबांना कंपन्यांनी नोकरी दिली पाहिजे. त्यासाठी पक्षाने आग‘ही भूमिका घेतली पाहिजे. मात्र, त्यासाठी त्यांची योग्यताही पाहिली पाहिजे. नोकरीसाठी परराज्यातून आलेले नागरिक आहेत, त्यांच्यामागेही पक्षाने उभे राहिले पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

कमाल जमीन धारणेची मर्यादा कमी केली जाणार नाही. या कायद्यामध्ये बदल करणार नाही आणि तसा विचार नसल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी उपमु‘यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधींना पदे ही पक्षामुळे मिळाली आहेत. त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी वेळ द्या. अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याची मागणी होत आहे. या अधिवेशनात याविषयीचे विधेयक मांडण्याची सूचना काही आमदारांनी केली. पण हे विधेयक आणण्यासाठी आणखी चार विधेयके सभागृहात मांडावी लागणार आहेत.

अनधिकृत बांधकामे करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करा
आधिकृत बांधकामे ही काही एका दिवसात होत नाही. 5-5 मजली बांधकामे होतात. तेव्हा महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन काय करत होते. या इमारतींमध्ये प्रामु‘याने गरीब लोकांनी घरे असतात. या अनधिकृत बांधकामांविषयी राज्य शासनाने योग्य ते धोरण ठरविले पाहिजे. जर बेकायदेशीर बांधकामे अधिकृत होत राहिली तर या बांधकामांना परवाना मिळाल्यासारखेच होईल. त्यामुळे बेकायदेशीरपणे बांधकामे करणार्‍या कंत्राटदारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या धोरणामध्ये राज्य शासनाने दुहेरी भूमिका घ्यावी लागेल, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

‘त्यांनी’ नोकरी घेतली नाही.
मावळ गोळीबार प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना अजूनही नोकरी मिळाली नसल्याचा आरोप विरोधक करत आहे. या मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेचे अधिकार्‍यांनी त्यांना नोकरी देऊ केली होती. पण या नातेवाईकांनी नोकरी स्वीकारली नाही. विरोधकांनी या नातेवाईकांना सांगितले की, त्यांच्याकडून नोकरी घेऊ नका, अशी माहिती उपमु‘यमंत्री अजित पवार यांनी दिली.