
चेस्टर-ली-स्ट्रीट – आजपासून अशेस मालिकेतील चौथ्या कसोटीला सुरुवात होत आहे. ० -२ अशा पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला अशेस गमवावी लागली आहे. मात्र उर्वरित मालिकेत कामगिरी उंचावून मालिका बरोबरीत सोडण्याचे आव्हान टीम ऑसट्रेलियासमोर असणार आहे.

चेस्टर-ली-स्ट्रीट – आजपासून अशेस मालिकेतील चौथ्या कसोटीला सुरुवात होत आहे. ० -२ अशा पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला अशेस गमवावी लागली आहे. मात्र उर्वरित मालिकेत कामगिरी उंचावून मालिका बरोबरीत सोडण्याचे आव्हान टीम ऑसट्रेलियासमोर असणार आहे.
मँचेस्टरमधील तिस-या कसोटी ऑस्ट्रेलियाची कामगिरी बहरली. मात्र पावसामुळे थोडक्यात त्यांहचा विजय हुकला. विजयाची संधी हुकली तरी क्लार्क आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे पाहुण्यांकडून अपेक्षा वाढल्यात. मँचेस्टरमध्ये इंगलंडची कामगिरी ढेपाळली. पावसाच्या मेहेरबानीमुळे त्यांना तिसरी कसोटी अनिर्णित राखता आली तरी ‘व्हाइटवॉश’चे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र उर्वरित दोन्ही लढती जिंकून ४-० अशा फरकाने जिंकण्यास यजमान उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी विस्कळीत फलंदाजी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. मात्र तिस-या कसोटीत कर्णधार क्लार्कसह ख्रिस रॉजर्स, स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर ते अगदी मिचेल स्टार्कपर्यंत सर्वानी दमदार फलंदाजी केली. मात्र दुस-या डावात ‘फ्लॉप शो’ कायम राहिला. क्लार्कसह प्रमुख फलंदाजांनी सातत्य राखण्याची गरज आहे.
धडाकेबाज सुरुवात करणा-या कुक आणि सहका-यांच्या कामगिरीला तिस-या कसोटीत दृष्ट लागली. अनुभवी केव्हिन पीटरसन, कर्णधार अमलिस्टर कुक आणि इयन बेलने सातत्य राखले तरी अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या विजयाची संधी होती. चौथ्या कसोटीसाठी यजमानांनी ख्रिस ट्रेमलेट आणि ग्रॅहॅम ओनियन्स या तेज दुकलीचा समावेश केला आहे. दोघांच्या समावेशामुळे यजमानांना गोलंदाजीत अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.