अमिरचे लक्ष आता ‘पीके’वर

‘धूम ३’ सिनेमाचे शुट संपल्यानंतर अभिनेता आमिर खानचे लक्ष आता दिग़दर्शक राजकुमार हिरानीच्या ‘पीके’वर केंद्रित झाले आहे. याआधी रीमा कागती दिग्दर्शित ‘तलाश’ या सिनेमात आमिर वेगळ्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘धूम-३’ आणि राजकुमार हिरानीचा ‘पीके’ हे त्याचे महत्वाचे सिनेमे आहेत. ‘पीके’मध्ये त्यक’ची नायिका अनुष्का शर्मा असणार आहे.

यशराज बॅनरच्या बहूचर्चीत ‘धूम-३’ या सिनेमातून खलनायक म्हणून पहिल्यांदाच समोर येणारा आमिर खान कामावर जाम खूष आहे. ‘धूम-३’ च्या अंतिम चित्रिकरणाची रिळे पाहून आमिरला भलताच आनंद झाला आहे. याबाबत बोलताना अभिनेता अमिर म्हणला, ‘माझा खलनायक हा रोल प्रेक्षक कधी पाहणार याची ओढ मला लागली आहे. प्रदर्शनासाठी नाताळपर्यंत वाट बघणे असह्य झाले आहे. अंतिम चित्रिकरण पाहिल्यानंतर नाताळ आता मला फार दूर असल्यासारखा वाटतो आहे.’

आदित्य चोप्राच्या ‘धूम ३’ साठी आमिरने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारली आहे. लुकपासून अक्शन दृश्यांपर्यंत आमिरने आपला वेगळेपणा जपण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. या सिनेमात इन्स्पेक्टर जय दीक्षित म्हणून अभिषेक बच्चन आणि त्याचा सहकारी म्हणून अली अर्थात उदय चोप्रा कायम आहेत. आमिर ‘धूम’च्या या टीममध्ये नव्याने दाखल झाला असून कतरिना कैफ त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment