जगातला पहिला बोलणारा रोबोट किरोबो

टोकियो – जपानने जगातील पहिला बोलणारा रोबोट किरोबो ला अंतराळामध्ये 4 ऑगस्ट 2013 रोजी पाठविला. जपानच्या तनेगाशिमा द्वीपमधून एच 2 बी क्शेपणास्त्राच्या मदतीने रोबोट व अन्य सामान प्रक्षेपित केले आहे. हा रोटोब 9 ऑगस्ट 2013 ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये पोहोचणार आहे. यामुळेच बोलणारा रोबोट अंतराळात सोडणारा जपान हा जगातील पहिला देश बनला आहे.

नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ या किरोबोच्या हालचाली आणि त्याच्या परिक्षणासाठी लागला आहे. त्याचे पूर्ण परिक्षण केले आहे. इतकेच नाही तर किरोबोचा एक जुळा रोबोट मिराटा हा मात्र जपानमध्येच आहे. मिराटाच्या माध्यमातून त्याच्या जोडीदाराकडून अंतराळात होणारे कोणतेही इलेक्ट्रॉनिक बदल, तसेच गडबडीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

किरोबोला अंतराळात पाठविण्याचा उद्देश म्हणजे नवीन शोधाचा तो एक भाग होऊ शकतो. त्याचबरोबर दीर्घकाळापर्यंत एकटे राहणार्‍या व्यक्तीच्या बाबतीतील भावना या रोबोटच्या माध्यमातून मिळविता येणार आहेत. तसेच त्या मिळविण्यासाठी किरोबोचा वापर होऊ शकतो. या किरोबोची उंची 34 सें.मी. लांब आहे, तर त्याचा रंग काळा आणि पांढरा आहे.

या छोट्याशा मानवरूपी रोबोटचे वजन एक किलो आहे. आणि तो माणसाप्रमाणे अनेक गोष्टी करू शकतो. किरोबोची डिझाईन ही प्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड एस्ट्रो बॉय च्याकडून घेतलेली आहे. उम्मीद आणि रोबोट यामुळे जपानी शब्दावरून किरोबो हे नाव निवडले आहे. टोमोटाका टाकाहाशी, कार निर्माता टोयोटा आणि जाहिरात कंपनी यांच्या वतीने रोबोट किरोबो आणि त्याचा जोडीदार मिराटा बनविण्यात आला आहे.

हे दोन्ही रोबोट माणसांसोबत बोलू शकतात. तसेच या दोन्ही रोबोटमध्ये आवाज ओळखण्याची, चेहरा ओळखण्याची क्षमता आहे. त्यांच्यामध्ये कॅमेरा, माणसाच्या भावना ओळखणारे सॉप्टवेअर तसेच बोलण्यासाठी आवश्यक मशिन बसविण्यात आले आहे.