संधी मिळाल्यास वेगळा विदर्भ करणार : देवेंद्र फडणवीस

पुणे, – छोट्या राज्याच्या निर्मितीला भारतीय जनता पक्षाची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास, वेगळा विदर्भ करण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशापेक्षा राज्यात पक्षवाढीसाठी लक्ष घालावे, असा टोला त्यांनी लगावला.

एमआयटीच्या कार्यक्र‘मासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ डणवीस पुण्यात आले होते. आंध्र‘पासून स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, एनडीए कारकीर्दीत भाजपने तीन स्वतंत्र राज्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या छोट्या राज्यांनी विकासाचे मॉडेल उभे केले आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या भूमिकेला भाजपचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे.

अंखड महाराष्ट्र ही शिवसेनेची, तर छोट्या राज्यांना पाठिंबा ही भाजपची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भावरून काँग्रे‘सेची भूमिका दुटप्पीपणाची आहे. विदर्भात काँग्रेसची एकूण 27 आमदार आहे. स्वतंत्र विदर्भ केल्यास काँग्रेसची सत्ता राहणार नाही. त्यामुळे काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भाला विरोध करीत आहे. अशा परिस्थितीत संधी मिळाल्यास, वेगळा विदर्भ निर्माण करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एकीकडे अखंड महाराष्ट्र म्हणतात, तर दुसरीकडे स्वतंत्र विदर्भास विरोध राहणार नाही, असे प्रश्‍न विचारले असता फडणवीस म्हणाले, स्वतंत्र विदर्भावरून पवारांची भूमिका सोयीची आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाची स्थिती दयनीय झाली आहे. एका सर्व्हेनुसार 5 ते 6 जागा येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पवारांनी देशात लक्ष न घालता पक्षवाढीसाठी महाराष्ट्रात लक्ष घालावे, अशी टीका त्यांनी केली.

आदर्शच्या अहवालाबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केला
आदर्श अहवालाच्या संदर्भात ते म्हणाले, आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यासंदर्भात झालेल्या चौकशीचा अहवाल या अधिवेशनात सादर करण्यात आला नाही. त्यामुळे मु‘ख्यमंत्री चव्हाण यांनी विश्‍वासघात केला असून, ते भभ्र‘ष्टाचाराशी पाठिशी घालत आहेत. हा अहवाल जाहीर झाल्यास देशात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. या अहलावावरून सर्वांनाच धक्का बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
————————-