मृत सदस्यांची नावेही नाट्य परिषदेच्या मतदार यादीत

पुणे, – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेप्रमाणे पुणे शाखेच्या निवडणुकीची सुरुवातही घोळांनी झाली आहे. मतदार यादीमध्ये काही मृत सदस्यांची नावे झळकली अहेत, ती नावे भावनांचा आदर करून वगळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी स्पष्ट केले.

नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रकि‘या 1 ऑगस्टपासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, दुसर्‍याच दिवशी या प्रकि‘येतील घोळ समोर आला. परिषदेने निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये अनेक चुका असल्याचे स्पष्ट झाले. सुनील महाजन व शांतिलाल सुरतवाला यांनी या चुका परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्या. यादीमध्ये काही मृत सदस्यांची नावे तशीच ठेवण्याची गंभीर चूक परिषदेने केली आहे. त्यामध्ये रवींद्र भट, ज्योत्स्ना देवधर, सतीश तारे, अशोक चव्हाण, बबन शिंदे, संतोष नवले, संतोष लोखंडे यांच्या नावांचा समावेश असल्याचे महाजन यांनी सांगितले.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे नाव यादीतून गायब झाले आहे. निर्माते, दिग्दर्शक राजन मोहाडीक यांचा यादीत पत्ता नाही. अशा आणखी काही सदस्यांचे पत्ते यादीत नाहीत. यादीमध्ये इतर अनेक चुका असल्याने यादी नव्याने प्रसिद्ध करावी, अशी मागणी महाजन यांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे केली आहे. याविषयी धर्मादाय आयुक्तांकडेही तक‘ार करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. परिषदेने मतदारयादी 1 जुलै रोजी प्रसिद्ध केली आहे. यादीमध्ये काही मृत व्यक्तींची नावे राहिली आहेत; मात्र, त्याला परिषद जबाबदार नसून संबंधितांच्या नातेवाईकांनी त्या विषयीची माहिती परिषदेला देणे आवश्यक होते. कायद्याने आता ती नावे वगळणे श्‍नय नसले तरी लोकांच्या भावनेचा आदर करून ती नावे वगळण्याचा आम्ही प्रयत्न करू. असे भाऊसाहेब भोईर, निवडणूक निर्णय अधिकारी यानी जाहीर केले आहे.