कर्नाटकात आम आदमी पार्टीची स्थापना

कर्नाटक – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कर्नाटका येथे आपल्या पक्षाची स्थापना केली. आगामी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातून जागा लढविणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, काँग्रेस आणि भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. यामुळेच जनतेला उत्तम पर्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.

भाजप पक्षात सुरु असलेल्या पक्षांतर्गत वादामुळे भाजपचे अनेक वरिष्ठ नेते पक्षाविरोधात काम करण्यास तयार आहेत. काँग्रेसचे नेत्यांनी बेताल वक्तव्य करून गरिबांची क्रूर थट्टा केली आहे. यामुळेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा काँग्रेसचे राहूल गांधी हे दोघेही पंतप्रधान पदासाठी योग्य उमेद्वार नसल्याचेही केजरीवाल म्हणाले.