कैरो – इजिप्तचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांच्या जागी नुकतेच हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून न्यायाधीश अदली मन्सूर हे कारभार पाहत आहेत. मुर्सींच्या अगोदर होस्नी मुबारक हे राष्ट्राध्यक्ष होते. मात्र मुर्सी यांनी पायउतार व्हावे, यासाठी मुर्सी समर्थक इजिप्तमध्ये पुन्हा आपले प्राण हातात घेवून रस्त्यावर उतरले आहेत. या नागरिकांच्यावर लष्कराने बेछूट गोळीबार करून 170 नागरिक ठार केले आहेत तर 4500 हून अधिक जखमी केले आहेत. रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरूच होती. एकापाठोपाठ इजिप्तमध्ये मृत्यू होत आहेत. शनिवारीही मोठा प्रमाणत हिंसाचार झाला होता. नागरिक प्रचंड प्रमाणात अजूनही रस्त्यावर उतरत आहे. मुर्सी पायउतार झाल्यानंतरची हा सर्वात मोठा हिंसाचार आहे. यावर मुस्लिम ब्रदरहुडचे प्रवक्ते गहद अल हद्दाद म्हणाले,की आमचे लोक रात्रीपासून धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळ होण्याअगोदरच लष्कराने आंदोलकांवर गोळीबार केला. हा गोळीबार त्यांना ठार मारण्यासाठीच केला आहे.
अल जझिराने मृतांची संख्या 170 व जखमींची 4500 असल्याचे म्हटले आहे.मात्र आरोग्य विभागाने मृतांची संख्या 38, तर 120 जखमी असल्याचा दावा केला आहे. याअगोदर 8 जुलैला झालेल्या गोळीबारातही 53 मुर्सी विरोधक ठार झाले होते. दरम्यान, आमच्या समोर अल्जेरिया, सिरियाचे उदाहरण होते. आम्हीदेखील शस्त्र उचलू शकलो असतो, परंतु आम्ही इजिप्तला गृह युद्धाच्या खाईत लोटू इच्छित नव्हतो, असे मुस्लिम ब्रदरहुडचा प्रवक्ता हद्दाद म्हणाले आहेत. मुर्सी समर्थक रबा अल अदावियाजवळ आंदोलनाला बसले होते. त्या वेळी लष्कराने शनिवारी पहाटे तीनपासून सहा वाजेपर्यंत गोळीबार केला त्यामुळे सर्व नागरिक विखुरले होते. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. जोरदार गोळीबार केला जात होता. काळ्या वेशात पोलिस अमानुषपणे गोळीबार करत होते. विद्यापीठाचे छत, आजूबाजूच्या इमारती, पूल यावरून पोलिसांनी आंदोलकांना घेरून गोळीबार केला.त्यामुळे नागरिक भीतीने सैरभैर धावत होते तर ही गोळीबार सुमारे तीन तास चालूच होता. रात्रभर देशातील अनेक भागांत मुर्सी समर्थक-विरोधकांत संघर्ष सुरूच होता. लष्कराने आता समर्थन देण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे. मात्र अजूनही मुर्सी समर्थक रस्त्यावर आहेत.