
मुंबई: मुंबईत लोकलमध्ये एका महिलेचा विनयभंग महिलेला चालत्या ट्रेनमधून ढकलून देण्याचा प्रकार घडला. मात्र इतर प्रवाशांनी या इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजता महालक्ष्मीजवळ ही घटना घडली. लेडीज डब्यातून ही महिला महालक्ष्मीहून माटुंग्याला जात असल्याचे समजते.
देवराज कडप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई सेंट्रल जीआरपीने त्याला अटक केली. आज पहाटे साडेपाच वाजता महालक्ष्मीजवळ ही घटना घडली. लेडीज डब्यातून ही महिला महालक्ष्मीहून माटुंग्याला जात होती. त्यावेळी आरोपी देवराज कडपही महिलांच्या डब्यात चढला. त्यानंतर काही वेळातच त्यावने ट्रेनच्या दारापाशी उभ्या असलेल्या या महिलेचा त्यांने विनयभंग केला. या प्रकाराला महिलेने विरोध केला.
