अमिताभच बॉलीवूडचा सुपरस्टार

भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. यामुळे ब्रिटनमध्ये एक नुकतेच सर्वे करण्यात आला आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन हाच बॉलिवुडचा सर्वात मोठा स्टार असल्याचे पुढे आले आहे. ब्रिटिशमधील एशियाई वीकली न्यूजपेपर ‘ईस्टर्न आई’ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेमध्ये ‘बॉलिवुडच्या १०० सदाबहार स्टारची लिस्ट प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये क्रिटिक्स, फॅन्स आणि सिनेइंडस्ट्री मधील सर्वात जास्ते वोट अमिताभ बच्चनच्या‍ पारडयात पडले आहेत.

अमिताभने त्याच्या ४० वर्श कारकिर्दीत अमिताभने ‘शोले’ व ‘दीवार’ सारखी ब्लॉकबस्टर सिनेमे केली. त्याशिवाय काही दिवसांपासून त्यांनी पॉप्युलर रिऐलिटी टीवी गेम शो ‘कौन बनेगा करोड़पति’ चे होस्ट म्हणून काम करीत असताना बॉलिवुड आणि टेलिविजन मधील गॅप मिटविण्याचा प्रयत्न केला आहे.

बिग बी बॉलिवुडचा पहिला स्टार आहे. ज्याचा स्टैचू मैडम तुसाद म्यूजियममध्ये लावण्यात आला होता. या यादीत दुस-या क्रमांकावर दिलीप कुमार, तर तिस-या क्रंमाकावर शाहरूख खान आहे. ऐक्ट्रेसेसमधील ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर शोमैन राज कपूर, त्यांनतर नर्गिस, देवानंद, वहीदा रहमान, राजेश खन्ना आणि श्रीदेवीचा क्रमांक लागतो.

Leave a Comment