नवी दिल्ली- भारताने नुकत्याच तयार केलेल्या इन्सॅट-३ डी या उपग्रहाने यशस्वीरित्या आवकाशात झेप घेतली. या नव्याने आवकाशात सोडण्यात आलेल्या इन्सॅट-३ डी उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या उपग्रहाने लगेचच काम करण्यास सुरूवात केली असून भारतामधील हसन येथील उपग्रह नियंत्रण व्यवस्थेस इन्सॅट-३ डी उपग्रहाकडून संदेश मिळू लागले असल्याची महिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी प्रक्षेपणानंतर दिली.
फ्रेंच गयाना येथील कोओरु येथून इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे एरियनस्पेस या युरोपीय संस्थेच्या एरियन ५ या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इन्सॅट-३ डी आणि अल्फासेट या उपग्रहांचे यशस्वीपणे उड्डान होऊन प्रक्षेपण करण्यात आले. अल्फासेट हा युरोपमधील सर्वाधिक क्षमतेचा दूरसंचार क्षेत्रातील उपग्रह आहे. प्रथम अल्फासेट या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यानंतर पाच मिनिटांनी इन्सॅट-३ डी या उपग्रहाचेही यशस्वीपणे अवकाशात झेपावला.
य नव्या उपग्रहामुळे जलदगतीने हवामानविषयक अंदाज नोंदविता येणे शक्य होणार आहे. हा उपग्रह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. भारतामधील हसन येथील उपग्रह नियंत्रण व्यवस्थेस इन्सॅट-३ डी उपग्रहाकडून संदेश मिळू लागले आहेत. यापूर्वी अवकाशात सोडण्यवत आलेल्याय कल्पना व इन्सॅट-३ ए या उपग्रहांच्या तुलनेत इन्सॅट-३ डी उपग्रहामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली.