सैफ, करीना आणि करिश्मा करणार सिनेमा

आगामी काळात येत असलेल्या सिनेमात एकाच कुंटूबातील पती, पत्नी आणि मेहूणी एकत्र झळकणार आहेत. ‘द इंडियन फूड विजडम और आर्ट ऑफ ईटिंग राइट’ या सिनेमात सैफ अली खान, करीना कपूर आणि करिश्मा कपूर एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा न्यूट्रिशनवर आधारित असून हा सिनेमा रुजुता दिवाकर डायरेक्ट करीत आहे.

या सिनेमात या तिघांशिवाय रिचा चड़डा आणि अनुपम खेरपण काम करणार आहे. या सिनेमाची डीवीडी ऑफिशल २७ जूलै रोजी रिलीज होणार आहे. एकाच कुटूंबातील तिघा जणांना एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याने करीना, करिश्मा, सैफ खूपच उत्साहित आहेत. गेल्या काही दिवसांपासून करिश्मा कपूरला बॉलीवूडमध्ये पुनरागमन करायचे होते. त्यामुळे या सिनेमाची निवड तिने केली आहे.

या सिनेमाच्या माध्यामातून नागरिकाना चांगले व नेमके जेवणाचे फायदे काय आहेत हा मेसेज पोहचविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याशिवाय सीजनल फ्रेश आणि टेस्टी फूड सर्वांच्या हेल्थसाठी किती चांगले असतात हे पटवून देण्याचे काम या सिनेमातून सैफ, करिश्मा आणि करीना करणार आहेत. या सिनेमाच्या शुटची तयारी लवकरच सुरू होणार असून हा सिनेमा पुढील वषी रिलीज होणार आहे.

Leave a Comment