आयसीसी क्रमवारीत पुजारा आठव्या स्थानी

दुबई- नुकतेच आयसीसीने कसोटी मानांकन जाहीर केले आहे. त्यामध्ये टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आठव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करणार ऑफ स्पीनर अश्विन एका क्रमांकाने खाली आला असून तो नवव्या तर प्रज्ञान ओझा दहाव्या स्थानावर आहे, तर जलदगती गोलंदाज झहीर खान सतराव्या स्थानावर आहे. फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला अव्वल स्थानी असून वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल व ऑफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर आहे.

दोन दिवसापूर्वी अशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३४७ धावांच्या विजयामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचा चांगलाच फायदा झाला आहे. ज्यो रूटने लॉर्डस् कसोटीत ४६८ मिनिटांत १८० धावांची खेळी साकारल्यामुळे २१ स्थायनावरून २६व्या स्थानावर झेप झेतली आहे. जॉनी बेयरस्टोला १२ स्थानांचा लाभ मिळाला असून तो ५४व्या स्थानावर आहे, तर या ऍशेस मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणार्यान इयान बेलने १७व्या स्थानावरून ११व्या स्थानावर झेप घेतली आहे.

गोलंदाजांच्या यादीत जेम्स ऍण्डरसनला एका स्थानाचा फायदा झाला असून तो ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलसह पाचव्या स्थानावर आहे. लॉर्डस् कसोटीत १२२ धावा देत नऊ बळी घेणारा ग्रॅमी स्वान सातव्या स्थानावर आहे. टीम इंडियाचे गोलंदाजाने सातत्यंपूर्ण कामगिरी केल्याने त्यांचे स्थान कायम आहे.