अयोध्या दि.२२ – येथील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील दोन महंतांच्या गटातील वादाचे पर्यवसान भांडणात होऊन करण्यात आलेल्या गोळीबारात १ जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. वादग्रस्त रामजन्मभूमी मंदिराजवळच ही हनुमान गढी आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार महंत भावनाथ दास व महंत हरीशंकर दास हे हनुमानगढी मंदिरातील दोन वेगळ्या पंथांचे महंत आहेत. या मंदिरात भाविकांकडून मिळणार्या देणग्या, पैसे आणि या मंदिराची मालमत्ता यावरून या दोन पंथांत गेले कित्येक दिवस वाद आहे. हा परिसर रेड सिक्युरिटी झोनमध्ये आहे. या दोन्ही गटात झालेल्या वादावादीचे पर्यवसान गोळीबारात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
फैजाबादचे पोलिस सुपरिटेंडेंट राकेश सक्सेना यांनी दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असल्याचे व पोलिस तपास सुरू असल्याचे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस कारवाई करण्यास कचरतात कारण महंत भावनाथ यांचे राजकीय पक्षांशी साटेलोटे असून त्यांचा येथे चांगलाच वचक आहे. मात्र हनुमामनगढतील अन्य साधूंना महंत हरीशंकर यांच्याविषयी अधिक सहानुभूती असून ते या भागात अधिक लोकप्रिय आहेत.