इंग्लंडला धक्का; पीटरसन अनफीट

लंडन – इंग्लंडच्या संघांने लॉर्ड्स कसोटी जिंकून आगामी काळात मालिका विजयासाठी मार्गक्रमण करीत असतानाच त्यांना थोडासा धक्का बसला आहे. त्यांचा ‘स्फोटक फलंदाज’ केविन पीटर्सन दुखापतीमुळे तिसर्या कसोटी सामन्याकला अनफीट असल्याच्या कारणावरून मुकण्याची शक्यता आहे. आगामी काळात त्याची सामन्यापूर्वी ‘फिटनेस टेस्ट’ होणार आहे. त्यांनतर तो या ऍशेस मालिकेत खेळणार की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कांगारूविरूद़च्या दुस-या कसोटी सामन्यात शुक्रवारी क्षेत्ररक्षण करताना पीटरसनला दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या पोटरीचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्यात डॉक्टरांना असे आढळून आले आहे की त्याच्या पोटरीतील स्नायू खेचले गेले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्याय डावात तो क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. त्याटमुळे आगामी कसोटी सामन्यानत खेळणार की नाही याबाबात अनिश्चतेचे वातावरण आहे.
इंग्लंडचा संघ मार्च २०१३ मध्ये न्यूझीलंड दौ-यावर गेला होता. त्या दौ-यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याला या दौ-यातून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाहेर राहावे लागले होते. आता पुन्हा त्याला दुखापतीने ग्रासले असून तो तिसर्यात टेस्टमध्ये फिट होतो का ऍशेस मालिकेतूनच त्याला बाहेर पडावे लागते हे लवकरच कळेल. त्यामुळे हा इंग्लंडसाठी धक्काच मानाला जात आहे.