
मुंबई दि.२०- मुंबईत आत्तापर्यंत विकल्या गेलेल्या फ्लॅटमध्ये सर्वात महागडा ठरलेला वरळीच्या समुद्र महल इमारतीतील फ्लॅट विक्रमी किमतीला विकला गेला आहे. १७०६ चौरस फूटाच्या या फ्लॅटला २१ कोटी रूपये किंमत मिळाली असून चौरस फूटाला १ लाख २३ हजार रूपये दराने ही विक्री केली गेली आहे. यापूर्वी मुंबईच्याच नेपियन सी रोडवरील फ्लॅटला २०१२ सालात चौरस फुटाला १ लाख २० हजार रूपये असा दर मिळाला होता व ते त्याकाळात रेकॉर्ड होते. जिदाल ड्रगने या फ्लॅटची खरेदी केली होती.
