सैफ करणार कैटरीना, प्रियंकासोबत रोमान्स

बॉलीवुडचा अभिनेता सैफ अली खान आगामी काळात अभिनेत्री कैटरीना कैफ आणि प्रियंका चोप्रासोबत झळकणार आहे. एवढेच नव्हे तर आगमी काळात सैफ हा कैटरीना, प्रियंकासोबत सिल्वर स्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे.

अभिनेता सलमान खान सोबत ‘एक था टायगर’ सारखा ब्लॉक बास्टर सिनेमा करणारा दिगदर्शक कबीर खान या नवीन सिनेमाचे दिगदर्शन करणार आहे. आगामी काळात कबीर, साजिद नाडियाडवालाच्या बैनरच्या सिनेमाची निर्मिती करणार आहे. त्यासाठी त्यानी अभिनेता म्हणून सैफ अली खानची निवड केली आहे.

कबीर खानच्या या आगामी काळात येत असलेल्या सिनेमात सैफच्या अपोजिट अभिनेत्री कैटरीना कैफ आणि प्रियंका चोप्राची निवड करण्यात येणार आहे. याबाबत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कबीर खानच्या ‘एक था टायगर’ या सिनेमात कैटरीना कैफच्या सोबत सलमानने मुख्य भूमिका केली होती. त्यामुळे या सिनेमात कैटरीनाची वर्णी लागण्या‍ची आवश्यकता आहे.

Leave a Comment